कोरोणापासून तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेऊ शकतात - या 11 प्रश्‍नांची उत्तरे?

कोरोणापासून तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेऊ शकतात 

या 11 प्रश्‍नांची उत्तरे?


कोरोना व्हायरस हा अतिषय वेगाने वाढला असून याचे रुग्ण 110 देशाहून अधिक देशात दिसून आले आहेत. कोरोनावर अद्यापही औषध बाजारात उपलब्ध झालेले नाही व ते कधी उपलब्ध होईल हे सांगताही येत नाही त्यामुळे या 13 प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला माहित करून घेणं ही गरज बनली आहे.

1) कोरोणाची लक्षणे किती दिवसात दिसतात?

- कोरोनाची लक्षणे दिसण्यासाठी 5 दिवसाचा कालावधी लागतो पण काही रुग्णांमध्ये जास्त दिवस पण लागू शकतो, डब्ल्यु एच ओ च्या संशोधनानुसार याची लक्षणे 14 दिवस राहतात तर काही संशोधन संस्थेच्या मतानुसार याची लक्षणे 24 दिवसापर्यंतही राहू शकतात.

2) हा आजार बरा झाल्यावर पुन्हा होण्याचा धोका आहे का? 

- या प्रश्‍नांचे उत्तर अद्याप माहित नाही. हा व्हायरस गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेला आहे, त्यामुळे यावर अजुन म्हणावे तितके संशोधन झालेले नाही. तरीही लस आणि औषधोपचारामुळे असे आजार पुन्हा होण्याची शक्यता ही कमी असते.

3) फ्ल्यू आणि कोरोना व्हायरसमध्ये काय अंतर आहे?

- या दोन्हीमध्ये आजाराचे लक्षण एकसारखे आहेत, त्यामुळे मेडिकल टेस्ट केल्याशिवाय यातील फरक ओळखणे अवघड आहे. कोरोना व्हायरसचे प्रमुख लक्षण ताप व सर्दीच आहे, पण फ्ल्यू मध्ये दुसरी लक्षणे पण दिसतात जसे घशामध्ये दुखणे. 

4) स्वत:ला एकांतात कसे ठेवाल?

- एकांतात राहणे म्हणजे स्वत:ला एका बंद खोलीत ठेवणे, कोणत्याही सार्वजणीक ठिकाणी न जाणे, ऑफीस, शाळा इत्यादि ठिकाणी न जावे व सार्वजनिक वाहने व एस.टी.पासून दूर ठेवणे. तुम्हाला आपल्या घरातील लोंकापासूनही वेगळे राहवे लागते. जर आपल्याला कोणत्या वस्तूची गरज लागली तर दुसर्‍या एकाद्या सदस्याची मदत घ्यावी. तुम्हाला तुमच्य पाळीव प्राण्यांपासूनही दूर राहिले पाहिजे जर हे शक्य नसल्यास त्यांना हात लावण्यापूर्वी व लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावे.

5) अस्थमाच्या रुग्णांसाठी कोरोना व्हायरस किती धोकादायक आहे? 

- घशाला झालेले कोणतेही संक्रमन अस्थमाच्या रुग्णांला धोकादायक असते. असे रुग्ण पुढील काही सावधगीरी बाळगू शकतात. यामध्ये डॉक्टरांनी दिलेले इनहेलरचा वापर करणे यामुळे कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका कमी होतो.

6) काय फोन वरूनही कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ शकते? 

- कोरोना व्हायरस हा खोकल्याने किंवा शिंकल्याने एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला होऊ शकतो. पण तज्ज्ञांचे मत आहे की हा व्हायरस एखाद्या जागेवरही राहू शकतो तेही कितीतरी दिवस. यामुळे आपला फोन कुठेही असला तरी तो वारंवार स्वच्छ करणे गरजेचे आहे.

7) दरवाजाच्या हॅन्डलला स्पर्श केल्यामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ शकतो ?

- जर एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीने शिंक आल्यावर जर नाकाला हात धरला असेल आणि तोच हात न धुता जर दरवाजाच्या हॅन्डलला लावला असेल तर अशा हॅन्डलवर कोरोनाचा व्हायरस राहू शकतो.

8) स्विमिंग पुलात पोहोने किती सुरक्षित आहे?

- बर्‍यापैकी स्विमिंग पुलमधील पाण्यात क्लोरीन मिसळलेले असते यामुळे पाण्यात असलेले सर्व विषाणू नष्ट होतात. अशा ठिकाणी पोहोणे हे सुरक्षीत आहे.

9) मास्क वापरणे किती सुरक्षित आहे?

- खर तर सर्वसामान्यपणे डॉक्टर मास्क वापरताना दिसतात पण सामान्य नागरिकांने मास्क वापरल्यामुळे खुप मोठा बदल झालेले दिसून येत नाही. ब्रिटनचे तज्ज्ञ म्हणतात कोरोना व्हायरस पासून बचावकरण्यासाठी आम्ही मास्क वापरण्याचा सल्ला देत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार मास्कऐवजी वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुणे हेच जास्त फायदेशीर आहे.

10) लहान मुलांस किती धोकादायक?

- चिन मधे मिळालेल्या आकडेवारेनुसार लहान मुलांवर या व्हायरसचा जास्त प्रभाव पडलेला नाही. पण ज्या मुलांना घशाचा आजार सारखे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

11)  संक्रमित व्यक्तींने बनविलेले अन्न किती धोकादायक आहे?

- संक्रमित व्यक्तीने जर सावधगिरी बाळगून स्वयंपाक केला नाही तर कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका आहे. जेवण बनवताना शिंकल्यामुळे किंवा हात न धुता स्वयंपाक केल्यामुळे कोरोनाचे संक्रमण होऊ शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने