Main Featured

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर पण…

 

एका प्रकरणाची सुनावणी अद्याप बाकी असल्याने मुक्काम तुरुंगातच

                
        बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र जामीन मंजूर होऊनही ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असल्याने तूर्तास लालूप्रसाद यादव यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही. चाईबासा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांनी त्यांची अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे.
 या प्रकरणातील अर्धी शिक्षा पूर्ण झाल्यानेच लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.


Post a comment

0 Comments