Main Featured

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाने नुकसान तुमच्या भागात बघा किती झाले नुकसान

दरम्यान रविवारी (ता. ११) सकाळपासून औरंगाबाद जिल्ह्यातील विहामांडवासह परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापूस उत्पादकांचे हाल  झाले. कापूस पीक वाया जाण्याची शक्यता आहे. वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती होतील अशी चिन्ह आहेत. दावरवाडी (ता. पैठण) परिसरात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू होता. ढोरकीन येथे जोरदार पाऊस सुरू होता.

जालना जिल्ह्यात रविवारी सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. जिल्ह्यातील वाटुरला विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परतूरला सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. शहागडसह परिसरात पाऊस सुरू होता.कुंभार पिंपळगाव परिसरात सकाळी आठ वाजेपासून पाऊस सुरू होता, सूर्यदर्शन झाले नव्हते. घनसावंगी परिसरातही जोरदार पाऊस झाला. जांबसमर्थ व परिसरात सकाळी दहा वाजेपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तीर्थपुरीत मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. तळणी व परिसरात सकाळी नऊ वाजेपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता.मंठा तालुक्यात सकाळी नऊ वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू होता. रोहिलागड परिसरात सकाळी दहा पासून भूरभूर पाऊस सुरू आहे. वेचणीस आलेल्या कापूस पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत होते.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे ः
बीड जिल्हा ः बीड ११.५, पाटोदा २२.५, १४.८ माजलगाव २०, गंगामसला २५.५.

लातूर जिल्हा : लातूर १९.३, बाभळगाव २१.८,हरंगुळ २३.३, कासारखेड १८.३, मुरुड ५६.८, गातेगाव २३.५, तांदुळजा २३.३, लामजना ४२, कीलारी १९.१, उजनी ५३, निलंगा २२.८, कासार बालकुंदा २६, कासार शिरशी २३.५, हलगरा २०, तोंडार २९.५, नालेगाव ३०.३.

उस्मानाबाद जिल्हा : उस्मानाबाद ग्रामीण २९.५,केशेगाव ११.५, ढोकी १९.५,अशू १६.५, अंभी १३.५,भूम ३२, वालवड ३३.५,ईटकुर २९.५, येरमाळा ३३.५,मोहा ३२.५, गोविंदपुर २१.२, उमरगा २०.३, डाळिंब ३१, मुळज २७.३, वाशी ४८.८, पारगाव ११.८.

औरंगाबाद जिल्हा : बिडकीन ३७.८, ढोरकीन १३.८, औरंगाबाद १६, भावसिंगपुरा १४.

जालना जिल्हा : कुंभारझरी २१, अंबड १२.८, आष्टी ११.८.

Post a comment

0 Comments