Main Featured

कोरोना मुळे तुटले ब्रम्हचर्य, माधव पाटील यांना करावे लागले वयाच्या 66 व्या वर्षी लग्न...

कोरोना मुळे तुटले ब्रम्हचर्य, माधव पाटील यांना करावे लागले वयाच्या 66 व्या वर्षी लग्न... 
कोरोनामुळे माणसं अक्षरशः तुटून गेलेत काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे आर्थिक नुकसान झाले आणि यात माणसं अक्षरशः तुटून गेली. मात्र रायगड जिल्ह्यातील माधव पाटील यांचं ब्रह्मचर्य सुद्धा टिकलं नाही. वयाच्या 66व्या वर्षी माधव पाटील यांना लग्न करावे लागले. मात्र नेमकं असं काय झालं ज्यामुळे त्यांना या वयात लग्न कराव लागलं वाचा सविस्तर बातमी... 

माधव पाटील यांनी अखंड ब्रम्हचर्य पाळायचा निर्धार केला होता. मात्र कोरोनाच्या काळात प्रचंड एकाकीपणा आला आणि त्यांना "सहजीवन" या शब्दाची व्याख्या कळाली. या आगोदर त्यांना कधी ही असा एकाकीपणा आला नव्हता. पण कोरोनच्या लॉकडाऊन च्या काळात त्यांना खूप एकाकीपणा आला. त्यावेळी त्यांना आपल्याला सहचरणी असावी अस त्यांना वाटू लागले.
 
याचं वेळी या घटस्फोटित असलेल्या संजना यांचा भावाचा देखील कोरोनाने मृत्यू झाला. या दोघांना ही आधाराची गरज होती म्हणून दोघांनी विचार करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे अखंड ब्रह्मचर्य पाळण्याचा निर्धार असलेले माधव पाटील यांना कोरोनामुळे बोहल्यावर चढले...

Post a comment

0 Comments