Main Featured

अमरावती शिक्षक मतदारसंघात अभिजित देशमुख यांची प्रचारात आघाडी

"अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या शिक्षक आघाडीत झालेल्या बिघाडीचा फायदा उचलण्याची रणनिती शिक्षक क्रांती संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा उमेदवार अभिजीत देशमुख यांनी आखली आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार देशपांडे यांना अभिजित देशमुख यांच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे."
कोरोना काळातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल निवडणूक आयोगाने वाजवले आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत एकूण 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना अपक्ष उमेदवार शिक्षक क्रांती संघटनेचे अभिजीत देशमुख यांच्या प्रचाराची व भाषणातून टोलेबाजीची चर्चा सध्या शिक्षक मतदारसंघात दिसुन येत आहे तर दुसरीकडे भाजपाचे नितीन धांडे, भाजप नेते अनिल बोंडे यांच्या अपक्ष रिंगणात उतरलेल्या बहीण संगीता शिंदे यांचे आव्हान आहे. त्यामुळे अनिल बोंडे आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहतील की एकुलत्या एका बहिणीला मदत करणार, यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. 

विभागात एकूण मतदान केंद्र : 77
निवडणूक रिंगणात एकूण उमेदवार : 27
अमरावती शिक्षक मतदार संघात 5 जिल्हे येतात
अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा

जिल्हानिहाय मतदार
अमरावती : 10 हजार 88
अकोला : 6 हजार
बुलडाणा : 7 हजार 422
वाशिम : 3 हजार 773
यवतमाळ : 7 हजार 407
एकूण : 34 हजार 690 मतदार

मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या श्रीकांत देशपांडे यांच्यासमोर शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण शेळके यांचे आव्हान होते. श्रीकांत देशपांडे यांनी अरुण शेळकेंचा पराभव करत विजय मिळवला होता. आता शिवसेना-भाजप वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी अपक्ष उमेदवार अभिजीत देशमुख सज्ज झाले आहे.

Post a comment

1 Comments